
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शाखा क्र. 142 तर्फे विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. ईशान्य मुंबई विभाग क्र. 8 चे विभागप्रमुख सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाखाप्रमुख शिवाजी झोरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला स्थानिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शिवसेना उपनेते व शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष भाऊ कोरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विभाग संघटक प्रज्ञा सकपाळ, नगरसेवक विठ्ठल लोकरे, माजी नगरसेवक अनिल पाटणकर, माजी नगरसेविका सुनंदा लोकरे, विधानसभा प्रमुख संजय चव्हाण, हेमंत साळवी, तात्या सारंग, गणेश नायडू, एकनाथ खराडे यांच्यासह विधानसभा संघटक इब्राहम पटेल, विधानसभा निरीक्षक रघुनाथ शिंदे, सुभाष चौगुले, गुफरान चाचू, मोहम्मद सुफी, सोमनाथ पाखरे, संदीप वेताळे, रोहन गेजगे, हर्षल ऊसतुरे, अजय गायकवाड, जगदीश वायकर, विद्या सावंत, ज्योती झोरे, अर्चना झोरे, मनीषा कोकरे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी कारण्यासाठी गोपाल पाटील, भरत मोरे, निरंजन पाळेकर, संभाजी झोरे, विनोद सावंत, रवी सनई, राजू मोहिते, राजू वडारी, नितीन आरडे, केशव सूर्यवंशी, संदीप एरंडे, संदीप साठे, प्रताप गुंजाळ, नरेश तेली, सुरेश प्रधान यांनी विशेष परिश्रम घेतले.
























































