
मेष (ARIES – Tuesday, May 2, 2023)
आरोग्याची काळजी घ्या. शिव मंदिरात जाऊन अभिषेक करा. नातेवाईकांची भेट घ्याल. भावना जपा. अनुभवी लोकांचे मार्गदर्शन घ्या. कामाच्या ठिकाणी नवीन ओळखी होतील. घराचे सुशोभिकरण कराल. शोच्या वस्तूंची खरेदी कराल.
शुभरंग : गुलाबी
वृषभ (TAURUS – Tuesday, May 2, 2023)
मौन पाळा, पोटाला आराम मिळेल असा हलका आहार घ्याल. घरात अनावश्यक सामान जमा करू नका. आज दिवस करमणुकीचा आहे. कुणालाही दुखवू नका. कुटुंबाच्या गरजा समजून घ्या. प्रिय व्यक्तिसोबत वेळ घालवाल. सकाळचा वेळ ध्यानधारणा, सूर्योपासना करण्यात घालवा.
शुभरंग : लाल
मिथुन (GEMINI – Tuesday, May 2, 2023)
कुमारिकांना बांगड्या आणि लाल वस्त्र दान करा. आजचा दिवस चैतन्याने भरलेला आहे. महत्त्वाच्या मुद्द्यांवर घरच्यांसोबत बसून बोलाल. मुलाखत देण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. लाल रंगाचा पोषाख परिधान करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. आवडते फुलझाड अंगणात लावा.
शुभरंग : जांभळा
कर्क (CANCER -Tuesday, May 2, 2023)
कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका. कुटुंबातील मोठ्या व्यक्तिंसोबत गप्पा मारण्यात वेळ घालवाल. व्यस्त दिनचर्येतून स्वत:साठी वेळ काढाल. सकाळी लवकर उठा. उगाचच बडबड करू नका. पैशाची बचत करा. बक्षीस समारंभाचे आमंत्रण येईल. सहकाऱ्यांबरोबर आनंद द्विगुणित होईल.
शुभरंग : निळा
सिंह (LEO – Tuesday, May 2, 2023)
हिरव्या रंगाचा पोषाख परिधान कराल. आवडीचा पदार्थ खायला मिळेल. घरातील वातावरण सुखदायक असेल. केळीच्या पानात गुरुवारी जेवा. प्रिय व्यक्ति तुमची काळजी घेईल. नोकरीतील अडचणी दूर होतील. परिस्थितीपासून दूर पळू नका. प्रिय व्यक्तीसाठी खास बेत आखाल. मार्केटिंग क्षेत्रात संधी शोधाल.
शुभरंग : आकाशी
कन्या (VIRGO – Tuesday, May 2, 2023)
व्यसन टाळा. भावना समजून घ्या. व्यावसायिकांना नवीन संधी चालून येण्याची शक्यता आहे. उगाचच कोणाला लाडीगोडी लावायला जाऊ नका. सावधानता बाळगा. कामाच्या ठिकाणी आज छानशी ट्रीट मिळेल. अनोळखी व्यक्तिसोबत गप्पा मारण्यात अति वेळ घालवू नका. आरोग्याची काळजी घ्याल.
शुभरंग : मोरपिसी
तूळ (LIBRA- Tuesday, May 2, 2023)
सूर्यकिरणांमध्ये काचेची बाटली ठेवा. त्यातील पाण्याचा त्वचेसाठी वापर करा. रिकामा वेळ मोबाईलमध्ये पाहण्यात किंवा पुस्तक वाचण्यात घालवाल. शांतपणे काम कराल. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक कराल. कामाचा आर्थिक मोबदला चांगला मिळेल. मनाजोगी खरेदी करण्यासाठी वेळ काढाल.
शुभरंग : राखाडी
वृश्चिक ( SCORPIO – Tuesday, May 2, 2023)
अतिजास्त प्रमाणात कॉफी पिऊ नका. मित्रमंडळींसोबत प्रवास करण्याचा योग आहे. खासगी आणि गुप्त माहिती उघड करू नका. खर्च लांबणीवर टाका. टीव्ही आणि मोबाईलचा वापर चुकीच्या पद्धतीने करू नका. नवे तंत्रज्ञान शिकून घ्या. जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा मारा. उत्पन्नाचा नवा स्त्रोत हाती लागण्याची शक्यता आहे.
शुभरंग : किरमिजी
धनु (SAGITTARIUS – Tuesday, May 2, 2023)
पूजेकरिता गोपीचंदनाचा वापर करा. डोळ्यात डोळे घालून संवाद साधा. जोडीदाराकडून आवडती भेटवस्तू मिळेल. नवीन आर्थिक योजनांद्वारे गुंतवणूक कराल. कोणतेही वचन देण्याआधी चांगल्या वाईट गोष्टींचा विचार करा. आजचा दिवस तुमच्यासाठी सुंदर आहे. नात्याला महत्त्व द्याल. आरोग्याची काळजी घ्या.
शुभरंग : सोनेरी
मकर ( CAPRICORN -Tuesday, May 2, 2023)
बालपणींच्या आठवणींमध्ये रमाल. विनाकारण मानसिक त्रास करून घेऊ नका. उधार घेतलेले पैसे वेळेत परत करा. एकांतात आनंदी राहाल. जोडीदार तुमचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी प्रयत्न करेल. रोज सकाळी देवपूजेसाठी थोडासा वेळ काढा. लाल रंगाचा पोषाख परिधान करा. लहान मुलांना गोड पदार्थ खाऊ घाला. सामाजिक कार्यात भाग घ्याल.
शुभरंग : पांढरा
कुंभ (AQUARIUS -Tuesday, May 2, 2023)
नातेवाईक-मित्रमंडळींची भेट घ्याल. तब्येत बरी नसलेल्या नातेवाईकाला भेटायला जाल. आई-वडिलांची काळजी घ्याल. आरोग्य जपा. कामाचा ताण घेऊ नका. तुमच्या संपर्कातील लोकांना खूश ठेवण्यासाठी प्रयत्न कराल. पैसे जपून वापरा.
शुभरंग : चंदेरी
मीन (PISCES – Tuesday, May 2, 2023)
सूर्यस्नान करा. दररोज व्यायाम करा. आजचा दिवस आनंदाचा आहे. चांगल्या संधी वाया घालवू नका. आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात भाग घ्याल. जुन्या मैत्रिणीची भेट होईल. सायंकाळी बागेत फिरायला जाल. नाटक, सिनेमा अशा मनोरंजनात्मक कार्यक्रमात स्वत:ला गुंतवून घ्याल. उगाचच नको त्या ठिकाणी स्वत:चा मोठेपणा मिरवू नका.
शुभरंग : गुलाबी

























































