टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष मगुफुली यांच्या शोकसभेत चेंगराचेंगरी, 45 नागरिक ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील लाचखोरी आणि भ्रष्टाचाराविरोधात लढा पुकारणारे टांझानियाचे लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष जॉन मगुफुली यांच्या शोकसभेला  टांझानियन नागरिकांनी तुफानी संख्येने उपस्थिती लावली होती. दार ए सलाम या व्यापारी राजधानीच्या
शहरातील स्टेडियमवर मगुफुली यांना आदरांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. सभेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत सुमार 45 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून शेकडो नागरिक जखमी असल्याचे वृत्त आहे.