सायन्सपेक्षा आर्टस्, कॉमर्सचा टक्का वाढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

अकरावी प्रवेशात विद्यार्थ्यांचा कल सायन्सपेक्षा आर्टस् आणि कॉमर्स शाखेकडे असल्याचे जाहीर झालेल्या अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीवरून स्पष्ट झाले आहे. प्रवेशासाठी चुरस असलेल्या मुंबईतील काही नामांकित कॉलेजमध्ये सायन्सपेक्षा आर्टस् आणि कॉमर्सच्या कटऑफचा टक्का यंदा वाढला आहे. एनएम कॉलेजची कॉमर्सची कटऑफ ९४.२ तर सेंट झेवियर्सचा आर्टस्चा कटऑफही ९४.२ टक्क्यांवर क्लोज झाला आहे. सायन्ससाठी विद्यार्थ्यांच्या पहिल्या पसंतीच्या रुईया कॉलेजचा कटऑफ ९३ टक्के आहे.

गुरुवारी आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स शाखेची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तिनही शाखांच्या कटऑफमध्ये १ ते ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. नव्वदीपार टक्के मिळविणाऱया विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचा हा परिणाम असल्याचे मत शिक्षणतज्ञांनी व्यक्त केले आहे. गेल्या वर्षी एन. एम. कॉलेजची कॉमर्सची कटऑफ ९१.८३ होती. यंदा त्यात २.३७ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर सेंट झेवियर्सची आर्टस्ची कटऑफ ९४ वरून यंदा ९४.२ टक्क्यांवर पोहोचली आहे. मिठीबाई कॉलेजच्या आर्टस्च्या कटऑफमध्ये यंदा विक्रमी वाढ झाली आहे. मिठीबाईच्या सायन्सच्या कटऑफमध्ये यंदा ३.२३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीचा कटऑफ ८५.१७ होता तो यंदा ८८.४ वर पोहोचला आहे. या कॉलेजचा आर्टस्चा कटऑफही ८३.८ ० वरून यंदा थेट ८७.२ वर पोहोचली आहे. रुईयाचा आर्टस्चा कटऑफही ९ ०.६ ० वरून ९२.२ टक्के झाला आहे.

-ऑनलाइन प्रवेशाच्या http://mumbai.11thadmission.net या वेबसाइटवर जाऊन centralized allocation result 1 या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज क्रमांक टाकावा. त्यानंतर विद्यार्थ्याला अलॉट झालेल्या कॉलेजची माहिती दिसेल.
-विद्यार्थ्याला त्याच्या पहिल्या पसंतीचे कॉलेज अलॉट झाले असेल तर दिलेल्या मुदतीत कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे.

-२ ते १ ० पसंतीक्रमाचे कॉलेज अलॉट झाले असल्यास विद्यार्थी संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेऊन शकतात किंवा दुसऱया यादीत प्रवेश मिळण्याची वाट पाहू शकतात.

-दुसऱया यादीसाठी विद्यार्थी कॉलेज पसंतीक्रम बदलू शकतात. १ ० व ११ जुलै या कालावधीत कॉलेज पसंतीक्रम बदलून त्यांची प्रिंट काढून ठेवावी. जर पसंतीक्रम बदलायचे नसतील तर पूर्वीचेच (पहिल्या यादीचे) पसंतीक्रम ग्राह्य करून दुसऱया यादीसाठी कॉलेज अलॉटमेंट करण्यात येईल.
-ऑनलाइन अर्ज केलेल्या 3५ हजार ७८७ विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे. यात आर्टस्चे ५९१७, कॉमर्स शाखेचे १७ हजार ६ ०४, विज्ञानाचे ११ हजार 3८४ तर एचएसव्हीसीचे ८८२ विद्यार्थी आहेत.

cutoff

कोटय़ातील प्रवेश (इनहाऊस, व्यवस्थापन, अल्पसंख्याक) -१९ हजार ८६ ०

पहिल्या यादीत एसएससीचे १ लाख १२ हजार विद्यार्थी
बोर्डनिहाय झालेल्या प्रवेशात एसएससी बोर्डाच्या १ लाख ११ हजार ४६१ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. त्याखालोखाल सीबीएसईच्या ३ हजार १८४, आयसीएसईच्या ४ हजार ७ ०५, आयजीसीएसईच्या ३६०, आयबी ४, एनआयओएस २९५ आणि इतर बोर्डाच्या ५५९ विद्यार्थ्यांचा पहिल्या यादीत समावेश आहे.