अमृतकाळात बोचणारे विषारी वास्तव, ‘तो’ व्हिडीओ शेअर करत वडेट्टीवार यांची भाजपवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आदिवासी भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात गुंडेनुर नदीवर पूल नसल्याने इथली परिस्थिती फार भयंकर आहे. या गावात रुग्णवाहिका जाऊ शकत नसल्याने मृतदेह खाटेवर नेण्याची वेळ तेथील गावकऱ्यांवर आली आहे. याचा व्हिडीओ शेअर करत विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी ट्विट करत भाजप सरकारवर निशाणा साधला.

अमृतकाळात बोचणारे विषारी वास्तव, असे कॅप्शन वडेट्टीवार यांनी व्हिडीओ दिले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, आदिवासी भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात गुंडेनुर नदीवर पूल नाही. त्यामुळे गावात रुग्णवाहिका जाऊ न शकल्याने मृतदेह खाटेवर नेण्याची वेळ तेथील गावकऱ्यांवर आली आहे. मतांसाठी भाजपला आदिवासी आणि शेतकरी आठवतो. सत्तेत आल्यावर उद्योगपती आणि कंत्राटदारांचा विकास होतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

आदिवासी भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील विकासाच्या बाबतीत प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या अश्या अनेक घटना सतत समोर येत असतात. 9 वर्षात या भागाकडे केंद्र आणि राज्य सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले. दुर्गम भाग असलेल्या जिल्ह्यात आदिवासींचे मोठे हाल होत आहेत. नदी,नाल्यावर पुल नसल्याने तुडुंब भरलेल्या नदीतून जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागतो, असे त्यांनी म्हटले आहे.

गडचिरोली येथील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तिथल्या परिस्थितीची जाणीव होते. तिथल्या लोकांचा जगण्यासाठीचा संघर्ष दिसत आहे, अपुऱ्या सुविधांमुळे आदिवासींचे प्रचंड हाल होत आहेत. तिथल्या नदी, नाल्यांवर पूर नसल्याने ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अशातच गावातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीचा मृतदेह चक्क नदी ओलांडत खाटेवर टाकून नेण्यात येत आहे. हा व्हिडीओ समोर आला आहे.