
बाप्पांची मनोभावे सेवा केल्यानंतर जड अंतःकरणाने मुंबईकरांनी रविवारी सात दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला. महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार मुंबई आणि उपनगरांत सायंकाळी 6 वाजेपर्यंत घरगुती 1248 तर सार्वजनिक 14 गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. तर 76 गौराईंना निरोप देण्यात आला. ढोलताशांच्या गजरामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या’चा गजरात बाप्पांच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या. विसर्जनदरम्यान, कोणत्याही प्रकारची अनुचित घटना होऊ नये, म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या बंदोबस्ताबरोबरच मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर जीवरक्षक, होमगार्ड, पालिका कर्मचारी अशा विविध यंत्रेणेचे अधिकारी उपस्थित राहून गणेशभक्तांना मार्गदर्शन करत होते.

























































