
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या एसटीच्या ताफ्यात लवकरच 200 अत्याधुनिक व्होल्वो बसेस दाखल होणार आहेत. खासगी आराम बस सेवांकडे वळणाऱ्या प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने हे पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे प्रवाशांना मोबाईलवरून खासगी डिजिटल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवरूनही नव्या बसेसचे तिकीट बुकिंग करता येणार आहे.



























































