कोलगेट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने दात घासले, तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
tooth-brush-paste

कोलगेट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने चुकून दात घासणे धारावीतील 18 वर्षीय तरुणीच्या जिवावर बेतले. जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. आप्साना खान असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.

आप्सानाने शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास झोपेतून उठल्यानंतर ब्रश करायला घेतला. दात घासत असताना तिला वेगळीच चव लागली. तेव्हा आपण कोलगेटऐवजी उंदीर मारायची पेस्ट दात घासण्यासाठी वापरल्याचे तिच्या लक्षात आले. थोड्या वेळाने तिला त्रास व्हायला लागल्यानंतर आप्सानाला स्थानिक डॉक्टरकडे नेण्यात आले. पण त्यानंतरही त्रास कमी होत नसल्याने पालकांनी आप्सानाला आधी शीव मग तेथून जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. जे.जे. मध्ये उपचार सुरू असताना रविवारी सांयकाळी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.