
एका मुलीने ऑनलाईन मासिक पाळीचे सॅनिटरी पॅड मागवले होते, पण पॅडसोबत अशी वस्तू तिला पाठवण्यात आली की, सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. या घटनेची पोस्ट सोशल मिडियावर चर्चेत आहे. या पोस्टवर तिला स्विगीकडून उत्तर आले आहे तसेच ट्विटर युझर्सनीही यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या तरुणीचे नाव समीरा असे आहे. तिने स्विगी इंस्टामार्टकडून सॅनिटरी पॅड्स मागवले होते, पण पार्सल उघडून पाहते तर पॅड्ससोबत चॉकलेट कुकीज देऊन डिलिव्हरी मॅन निघून गेला. या प्रसंगांनंतर तिने माहित नाही हे कोणी केले, डिलिव्हरी करणाऱ्याने की, दुकानदाराने? असे ट्विटरद्वारे ट्विट केले. समीराच्या या पोस्टवर स्विगीकडून उत्तर आले आहे.
तिच्या पोस्टला स्विगी केअर्सने उत्तर दिले आहे की, ‘समीरा, तुमचा दिवस आनंददायी जावो अशी आमची इच्छा आहे. अनेक ग्राहकांनी स्विगीचे कौतुक केले आहे, तसेच काही ग्राहकांचे असे म्हणणे आहे की, स्विगी नियमितपणे आपल्या ग्राहकांना जाहिरातीच्या उद्देशाने मोफत भेटवस्तू देते.
स्विगीच्या या उत्तरावर एका युझर्सने लिहिले आहे की, ग्राहकांना खूश करण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांची जाहिरात करण्याच्या उद्देशाने ते असे करतात, तर दुसऱ्या युझर्सने सांगितले की, काहीही असो, हा एक चांगला हावभाव होता. तिसऱ्या ग्राहकांने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की, हा व्यवसायाचा भाग असून, एक चांगला मार्ग आहे. समिराच्या या ट्विटला आतापर्यंत 90 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.