
सामना ऑनलाईन । पणजी
गोव्याचे मुख्यमंत्री व माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते स्वादूपिंडाच्या कर्करोगाने आजारी होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मावळली. पर्रिकर यांच्या निधनाच्या वृत्ताने देशभरात शोककळा पसरली आहे.
Extremely sorry to hear of the passing of Shri Manohar Parrikar, Chief Minister of Goa, after an illness borne with fortitude and dignity. An epitome of integrity and dedication in public life, his service to the people of Goa and of India will not be forgotten #PresidentKovind
— President of India (@rashtrapatibhvn) March 17, 2019
मनोहर पर्रिकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना शनिवारी पणजी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र पर्रिकर उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. तसेच रविवार सकाळपासून त्यांनी डोळेही उघडले नव्हते. अखेर रविवारी संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मनोहर पर्रिकर हे तीन वेळा गोव्याचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर देशाचे संरक्षण मंत्री देखील होते. उरीचा सर्जिकल स्ट्राईक हा त्यांच्याच कार्यकाळात झाला होता.




























































