
मुंबई पोर्ट ऑथॉरिटीमध्ये एमबीए, आयटी, विधी पदवीधारकांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. मॅनेजर स्तरावरील काही पदांवर भरती केली जाणार आहे. ही भरती पूर्णपणे कंत्राटी पद्धतीने केली जाणार असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 6 जुलै 2026 पर्यंत आपले अर्ज सादर करता येणार आहेत.
भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 10 जागा भरल्या जाणार आहेत. चीफ मॅनेजर (बिझनेस डेव्हलपमेंट), सीनियर मॅनेजर (बिझनेस डेव्हलपमेंट), मॅनेजर (बिझनेस डेव्हलपमेंट), चीफ मॅनेजर (एन्व्हायर्नमेंट), मॅनेजर (एन्व्हायर्नमेंट), चीफ मॅनेजर (एन्व्हायर्नमेंट) अशा विविध पदांसाठी ही भरती होत आहे. पदांनुसार साधारण एक ते दोन लाख रुपये एवढे मानधन दिले जाणार आहे.



























































