
राज्यातील सत्ता संघर्षासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. अपात्र आमदार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी अपात्र आमदार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश थेट वाचून दाखवाला. त्यावेळी 31 डिसेंबर रोजी सरत्या वर्षात सरकारला निरोप देणार असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचे महत्व, अस्तित्व यावर मी दसरा मेळाव्यात बोललो होतो. देशातील लोकशाही, संविधान टिकणार की नाही यावर देशाचे लक्ष आहे. लोकसंख्येत हिंदुस्थान एक नंबरचा देश आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही धोक्यात आली असेल तर आपण सर्वजण, सर्वोच्च न्यायालय काय करत आहे? हा मोठा प्रश्न आहे’.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, ‘लवाद सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करणार आहे की नाही. हे लवाद सर्वोच्च न्यायालयाचे निकाल न जुमानता आपल्या मस्तीने वागत राहीले तर जे हाल होतील ते कुणालाही सावरता येणार नाहीत’.
नार्वेकर म्हणाले होते की, मी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश वाचलेला नाही. त्यांच्या या विधानाचा उल्लेख करत ‘काल न्यायालयाने नार्वेकरांना आदेश दिला आहे. काल नार्वेकर म्हणाले मी आदेश वाचला नाही म्हणून मी त्यांच्यासाठी आणि देशातील नागरिकांना हा आदेश वाचणार आहे. तसेच नार्वेकरांना देखील आदेशाची एक प्रत पाठवणार आहे’, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.





























































