जगातलं सर्वात जलद सर्च इंजिन असलेल्या गुगलचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे जगभरात खळबळ माजली होती. युजर्सला जीमेल व सर्च बार, युट्युब तसेच गुगलच्या इतर सेवा वारपण्यास अडचणी येत होत्या. त्याबाबत अनेकांनी सोशल मीडियावरून तक्रार केली होती.
काही दिवसांपूर्वी मायक्रोसॉफ्ट विंडोजची सेवा ठप्प झाली होती. त्याचा लोकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हर प्रणालीतील बिघाडामुळे जवळपास सर्वच देशांतील विविध सेवा ठप्प झाल्या होत्या. तरराष्ट्रीय विमानसेवेपासून बँकिंग सेवांना मोठा फटका बसलेला.
गुगलची दर मिनिटाची कमाई 2 कोटी रुपये
गुगल सर्वात प्रसिद्ध सर्च इंजिन आहे. गुगलवर कोणीही फुकटात काहीही सर्च करू शकतो. गुगलची सर्व्हिस फ्री आहे. परंतु गुगल जाहिरातीद्वारे प्रत्येक मिनिटाला 2 कोटी रुपयांची कमाई करत आहे. तसेच यूटय़ूबवर कोणताही व्हिडीओ पाहण्याआधी दोन ते तीन जाहिराती पाहाव्या लागतात. या जाहिरातीतून गुगल बक्कळ कमाई करतो. गुगल प्ले स्टोअरवरूनही गुगलला पैसे मिळतात.