
गुजरातमध्ये भाजपने एकहाती विजय मिळवत सत्ता राखल्यानंतर अवघ्या चारच दिवसांत ‘पक्षांतराचा खेळ’ सुरू झाला आहे. निवडणुकीत भाजपला आव्हान देणाऱया आम आदमी पक्षाच्या एका आमदाराने तसेच तीन अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा देण्याची घोषणाच आज करून टाकली. चारपैकी तीन आमदार आधी भाजपमध्येच होते.
जुनागडमधील विसावदारचे आमदार भूपत बियाणी, बायडचे आमदार धवल झाला, धानेराचे आमदार मावजी देसाई आणि वाघोडियाचे आमदार धर्मेंद्र वाघेला यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय आज घेतला. यातील भयाणी हे आपच्या तिकिटावर प्रथमच निवडून विधानसभेवर गेले आहेत. ते आधी भाजपमध्ये होते. निवडणुकीच्या काही महिने आधी ते भाजपला सोडचिठ्ठी देवून आपमध्ये गेले होते. त्यांनी आपल्या निर्णयाबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मी भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा देणार आहे; पण पक्षाशी गद्दारी करून भाजपात प्रवेश करणार नाही, असे त्यांनी सांगितले. झाला आणि देसाई यांनीसुद्धा भाजपचे तिकीट न मिळाल्याने बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यांनीही भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय आज घेतला.
151 आमदार करोडपती!
गुजरातमधील नवनिर्वाचित 182 आमदारांपैकी 83 टक्के म्हणजेच 151 आमदार करोडपती आहेत. त्यात भाजपच्या आमदारांची संख्या 132 आहे तर काँग्रेसचे 14, अपक्ष 3, आप व समाजवादी पक्षाचा प्रत्येकी एक आमदार आहे. गेल्या विधानसभेत करोडपती आमदारांची संख्या 141 इतकी होती. गुजरात इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमॉव्रेटिक रिफॉर्म्सने ही माहिती समोर आणली.
भूपेंद्र पटेल यांचा आज शपथविधी
भाजपने 182पैकी 156 जागा जिंकत आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय गुजरातमध्ये साकारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा पुन्हा एकदा येथे चालल्याचे दिसून आले. आता दुसऱयांदा मुख्यमंत्री होण्यासाठी भूपेंद्र पटेल हे सज्ज झाले असून उद्या (सोमवार) त्यांचा शपथविधी होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान मोदी, पेंद्रीय गृह मंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
सुक्खू, अग्निहोत्री यांचा शपथविधी
शिमला – सुखविंदर सिंह सुक्खू यांनी हिमाचल प्रदेशचे 15 वे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली. शिमला येथील रिज मैदानावर हिमाचलचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेक यांनी सुक्खू यांना मंत्रिपदाची शपथ दिली. सुक्खू यांच्यासोबत काँग्रेस नेते आणि प्रतिभा सिंह यांचे निकटवर्तीय मुकेश अग्निहोत्री यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते सुक्खू यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.




























































