गुजरातची जनता भाजपला कंटाळली – आप खासदार राघव चढ्ढा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
राघव चढ्ढा (आप खासदार)

गुजरातची जनता भाजप सकारला कंटाळली असून, आता परिवर्तन करण्याच्या विचारात आहे. गेली 27 वर्षे काँग्रेस भाजपला शह देऊ शकली नाही. यावेळी मात्र जनता दिल्ली आणि पंजाबसारखे सरकार गुजरातमध्ये आणण्यासाठी आम आदमी पार्टीला मत देणार असल्याचा विश्वास आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी व्यक्त केला.

खासदारराघव चढ्ढा यांनी मंगळवारी शिर्डीत साईदर्शनाला हजेरी लावली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार चढ्ढा म्हणाले, ‘भाजप पूर्ण देशात तोडाफोडीचे राजकरण करीत आहे. सामान्य माणूस भाजीपाला खरेदीसाठी बाजारात जातो तसे भाजपचे नेते आमदार, खासदार विकत घेण्यासाठी जात असतात. भाजपकडे इतके पैसे कुठून येतात, ते पैसे कुठे असतात, तिथे ईडी, सीबीआय पोहचू शकत नाही का?

आम्ही राजकारण करण्यासाठी नाही, तर राजकारण बदलण्यासाठी आलो आहोत. भाजप कधी जनतेच्या प्रश्नावर बोलत नव्हती. मात्र, आता आपमुळे भाजपला मुद्यावर बोलावे लागत आहे. भाजप देशातील स्वायत्त संस्थांना आपल्या युवा मोर्चाप्रमाणे चालवत असून, सगळ्या संस्थांचा राजकारणासाठी वापर करीत आहे. ज्या जनतेने यांना आकाशात नेऊन बसवले, तीच जनता पुन्हा खाली खेचणार, असेही ते म्हणाले.