रणवीरच्या गली बॉयचा टीझर बघितला का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
gully-boy-1

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता रणवीर सिंग याचा सिंबा हा चित्रपट गाजत असतानाच आता त्याच्या आगामी गली बॉय या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटात रणवीर एका झोपडपट्टीत तरुणाची भूमिका करत आहे. यात रणवीर एक रॅपर दाखवला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट व कल्की कोएचलिन या दोन अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. या टीझरमधून या चित्रपटाचा ट्रेलर 9 जानेवारीला रिलीज होणार असल्याचे जाहीर केले आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2019 ला रिलीज होणार आहे.