जावलीत दोन लाखांचा गुटखा जप्त, मेढा पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जावली तालुक्यातील गवडी गावात कारवाई करीत मेढा पोलिसांनी गुटख्यासह दोन लाख 19 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी मेढा पोलिसांत दोनजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समद अख्तार पठाण (वय 28, रा. सातारा), शंकर मधुकर मोरे (वय 32, रा. पाचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी अनिल पवार यांनी फिर्याद दिली आहे.

जावली तालुक्यातील गवडी येथून दोनजण गुटख्याची अवैध वाहतूक करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोन दुचाकींवरून जाणाऱया समद पठाण आणि शंकर मोरे यांना पकडले. त्यांच्या ताब्यातून दोन दुचाकींसह गुटखा असा दोन लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. हवालदार जाधव तपास करीत आहेत.