
ज्ञानवापी मशिदीतील कथित शिवलिंगाच्या कार्बन डेटींगची मागणी फेटाळली. मशिदीमध्ये असलेले कारंजे हे शिवलिंगाचा आकारासारखे आहे. हे कारंजे नसून शिवलिंग असल्याचा दावा हिंदू पक्षातर्फे करण्यात आला होता. मशिदीच्या जागी आधी शिवमंदिर होते असे हिंदू पक्षाचे म्हणणे असून, हा दावा सिद्ध करण्यासाठी कथित शिवलिंगाची कार्बन डेटींग चाचणी करण्यात यावी, जेणेकरून त्याचे वय किती आहे हे निश्चित केले जाऊ शकते अशी मागणी हिंदू पक्षाच्या वकिलांनी केली होती. 5पैकी 4 हिंदू पक्षकारांनी या कथित शिवलिंगाचे वय निश्चित करण्यासाठी पुरातत्व खात्यातर्फे शास्त्रोक्त पद्धतीने चाचणी करण्यात यावी अशी मागणी केली होती. एका हिंदू पक्षकाराने या मागणीला विरोध केला होता. सदर अर्जावरील सुनावणी 11 तारखेला पूर्ण झाली होती.




























































