तरंगणारे मंदिर

66

मंदिर म्हटलं म्हणजे तेथे काहीतरी चमत्कार झाला तर ते प्रसिद्ध होते. पण चीनमधील शानसी भागात असलेल्या दातोंग शहराच्या बाजूला एक मंदिर आहे. ते जमिनीपासून किमान 50 मीटर उंचावर आहे. त्या मंदिराला तरंगणारे मंदिर असंही म्हटलं जातंय. गेल्या 1400 वर्षांपासून हे मंदिर अस्तित्वात असल्याचे पुरावे सापडले आहेत. पहाडांच्या कडेला लागून असलेले हे मंदिर अशा प्रकारे बांधण्यात आले आहे की ते तरंगते आहे असेच वाटते. हा एक चमत्कारच म्हटला पाहिजे. विशेष म्हणजे येथे वेगवेगळ्या प्रकारच्या धर्मांचे लोक एकत्र येऊन आपापल्या ईश्वराची आराधना करत असतात. हे मंदिर पाहूनच मन खूश होते. अनेक लाकडांपासून हे मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिरावर असलेली डोंगराची शिळा अशा रितीने बाहेर आली आहे, जी पाहून त्यालाच हे मंदिर टांगून ठेवण्यात आले आहे असं वाटू शकते. गंमत अशी की तरंगणारे असूनही त्या मंदिरात जाणाऱ्या भाविकांपैकी कुणीही दरीत पडल्याची एकही घटना घडलेली नाही. चीनच्या त्या भागात प्रचंड पाऊस पडतो. मात्र त्याचाही धोका झालेला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या