
आधी टायटल आणि नंतर पोस्टर लाँचला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर ‘दिल बेधुंद’चा ट्रेलरही उत्साहात लाँच झाला आहे. या ट्रेलरलाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. हंसराज जगताप आणि नवोदित अभिनेत्री साक्षी चौधरी ही जोडी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.
वयानं हंसराजपेक्षा काहीशी मोठी दिसणारी साक्षी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असली, तरी त्यांच्यात चित्रपटात नेमकी कशी केमिस्ट्री दिसणार आहे, याविषयी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला गेली आहे. या दोघांसमवेत जयेश चव्हाण, आरती कुथे, नितीन पात्रीकर, प्रदीप रोंगे, संयोनी मिश्रा, धीरज तरुणे आणि गोविंद चौरसिया यांच्याही चित्रपटात भूमिका आहेत. संतोष फुंडे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून कथा गुड्डू देवांगन यांची आहे. चित्रपटाचं संगीत स्वप्नील शिवणकर यांचं असून गाणी के. स्वामी यांनी लिहिली आहेत. 19 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

























































