
सामना ऑनलाईन । मुंबई
ऐन गर्दीच्या वेळी हार्बरची वाहतूक ठप्प झाली आहे. खांदेश्वरजवळ ओव्हर हेड वायर तुटल्याने गेल्या वाहतूक ठप्प झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या अर्ध्या तासापासून लोकल जागच्या जागी ठप्प असल्याने गर्दी आणि उष्णतेमुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.
सोमवारी आठवड्याच्या पहिल्यात दिवशी हार्बरकरांना मनस्ताप सहन करावा लागला. सायंकाळच्या सुमारास खांदेश्वर येथे ओव्हर हेड वायर तुटल्याने वाहतूक विस्कळीत झाली. दोन्ही बाजूने लोकल जागच्या जागी थांबल्याने प्रवाशांचे हाल झाले. अनेक लोकलमधील लाईट आणि पंखेही बंद झाल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या. काही ठिकाणी प्रवाशांनी रुळावर उतरत रेल्वे स्थानक गाठले.
























































