
रेल्वे रुळ आणि ओव्हरहेड वायरच्या देखभाल-दुरुस्तीसाठी हार्बर मार्गावर घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात आला होता, तर हार्बर लाईनवर पुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान पाच तास लोकल सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. या काळात रेल्वेची देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात आली. परंतु, प्रवाशांना पर्यायी मार्गाने इच्छित स्थळ गाठताना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला.



























































