
सध्या सोशल मीडियावर दुधासारखे पांढरे शुभ्र हरणाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. खरंतर सुरुवातीला नागरिकांनी हा व्हिडीओ एआयच्या मदतीने तयार केला असावा असा अंदाज व्यक्त केला. मात्र हा व्हिडीओ खुद्द आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी त्यांच्या @himantabiswa या एक्स पोस्ट अकाऊंटवर शेअर केल्यामुळे ते हरीण पाहून लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अतिशय दुर्मिळ प्रजातीचे हे हरीण असून त्याला अल्बिनो हॉग डीअर म्हणजेच पांढऱया रंगाचे हरीण म्हणतात. हे हरीण आसामच्या काझीरंगा नेशनल पार्क अँड टाइगर रिजर्व येथे पाहायला मिळाले आहे. या व्हिडीओसोबत मुख्यमंत्री हिमंता यांनी असे दुर्मिळ दृश्य रोज पाहायला मिळत नाही. हे आमच्या संवर्धन प्रयत्नांचे यश दर्शवते, ज्यामुळे आसामच्या जंगलांमध्ये दुर्मिळ प्रजातींनाही टिकून राहणे आणि भरभराट करणे शक्य झाले आहे, असा संदेश दिला आहे.
























































