रत्नागिरीत पावसाचा कहर, मिरजोळीतील 13 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा हाहाःकार सुरू आहे. जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडल्याने खेडला पुराचा धोका निर्माण झाला आहे.चिपळूणात नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने मिरजोळी ग्रामपंचायत हद्दीतील जुवाड भागातील एकूण 13 कुटुंबातील  नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नातेवाईक यांच्या घरी  स्थलांतरित करण्यात आले .
दापोली तालुक्यात आज दुपारी दाभोळ येथील अमीरखान वजीरखान प्रभुलकर यांचे घराचे पडवी वर वाऱ्यामुळे माडाचे झाड पडून पडवीचे नुकसान झाले आहे. अगरवायंगणी येथील शांताराम शंकर टेमकर यांचे जुन्या घराचे वादळी वाऱ्यामुळे कौलांचे नुकसान झाले आहे, सदर घरात कोणीही राहत नाहीत. त्यामुळे जीवित हानी नाही. मौजे उक्षी येथील सीताराम बाळ लिंग गुरव व दत्ताराम बाळ लिंग गुरव यांच्या घराचा अतिवृष्टीमुळे चौथरा खचला असून भिंतीना तडे गेले आहेत . कुटुंबात एकूण 5 सदस्य असून स्थलांतर आवश्यक होते म्हणून शेजारी असलेले सुनंदा सावंत यांच्या घरात रहाणेची सोय केली. मौजे पेंडखळे येथील शंकर राम चव्हाण व तुकाराम राम चव्हाण यांचे अतिवृष्टी मुळे व वादळामुळे घराचे पत्रे पूर्णतः उडून गेले. मौजे नायशी वारा पावसाने जयश्री रघुनाथ कोतवडेकर यांच्या घराचे अंशता नुकसान झाले आहे. मौजे असुर्डे – कासारवाडी येथील विलास भार्गव नरोटे यांचे घराचे अतिवृष्टी मुळे अंशता नुकसान झाले आहे. श्रीपत भिकु  खेतले मुंढे तर्फे चिपळूण यांच्या घरावर रात्रीच्या पावसात झाड पडून नुकसान झाले आहे
पूर्व हसरे वाडी कोलकेवाडी येथील विष्णू धूधाजी कदम,गणपत रामा बंगालयांच्या घराचा संरक्षण बांध कोसळून किरकोळ नुकसान झाले आहे.दापोली तालुक्यातील आसूद येथे छाया सूर्यवंदन मोरे यांचे घराचे पडविचे पावसाने कोसळून अंशतः नुकसान झाले आहे, कोणीही जखमी नाही.  दापोली तालुक्यातील,कुंभवे येथील शशिकांत बाबू झाडेकर यांचे घराचे पडवीवर शिवणचे झाड पडून सिमेंटचे 4 पत्र्याचे नुकसान झाले आहे दापोली तालुक्यातील अबिदा अब्दल्ला हवा  रा.जामगे याच्या घराच्या पडवीवर झाड पडल्याने पडवीचे रक्कम 13000/- तेरा हजार नुकसान  झाले आहे .