तामीळनाडूत मुसळधार पावसाने हाहाकार! कन्याकुमारीसह चार जिल्हे बुडाले हजारो लोकांचे स्थलांतर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामिळनाडूच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाने हाहाकार माजला असून कन्याकुमारीसह चार जिल्हे पाण्यात बुडाले आहेत. हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हालविण्यात आले आहे. रेल्वे, रस्ते वाहतूक, पाणी, वीजपुरवठा पूर्णपणे बंद झाल्याने जनजीवन ठप्प आहे. दरम्यान, पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी पेंद्र सरकारकडे हेलिकॉप्टर्सची मागणी केली आहे.

पंधरा दिवसांपूर्वी मिचाँग चक्रीवादळ तामीळनाडूत धडकले होते. चेन्नईसह अनेक जिह्यांत मुसळधार पावसाने दाणादाण उडवली होती. आता दुसरे मोठे नैसर्गिक संकट तामीळनाडूवर धडकले आहे.

आतापर्यंत 13 हजारांवर नागरिकांना सुरक्षित स्थळी हालविले आहे. चार जिह्यातील तब्बल 40 लाख लोकांना महापुराचा फटका बसला आहे.