जोरदार सरींमुळे 38 ठिकाणी झाडे-फांद्या कोसळल्या, तीन ठिकाणी शॉर्टसर्किट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत आज सकाळपासून कोसळलेल्या पावसाच्या जोरदार सरींमुळे 38 ठिकाणी झाडे-फांद्या कोसळल्या. सुदैवाने यात कुणी जखमी झाले नाही. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला.

सकाळी 8 ते सायंकाळी 4 या कालावधीत शहर भागात फक्त -14 मिमी, पश्चिम उपनगरात – 9 मिमी तर पूर्व उपनगरात – 17 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, शहर भागात 7 ठिकाणी, पूर्व उपनगरात – 12 ठिकाणी तर पश्चिम उपनगरात – 19 ठिकाणी झाडे/ फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. शहर भागात 2 ठिकाणी तर पश्चिम उपनगरात 1 ठिकाणी अशा 3 ठिकाणी घरे, भिंती पडण्याच्या घटना घडल्या आहेत. तर पूर्व उपनगरात – 1 ठिकाणी तर पश्चिम उपनगरात 2 ठिकाणी अशा एकूण 3 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या आहेत.