शहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिन्नर

शहीद जवान नायक केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना सिन्नर पंचायत समिती व सिन्नर तालुका ग्रामसेवक युनियन व नाशिक जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या वतीने सिन्नर तालुका ग्रामसेवक युनियनच्या वतीने रोख रक्कम 25 हजार तर सिन्नर पंचायत समितीच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने रोख 31 हजार रुपयांची आर्थिक मदत शहीद जवानांच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात आली. तसेच नाशिक जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेच्या वतीने रुपये 21 हजारांचा धनादेश वीरपत्नी यशोदा केशव गोसावी यांच्याकडे देण्यात आला. शिंदेवाडी ता.सिन्नर येथील सैन्यदलाच्या 24 मराठा बटालियनचे नायक केशव गोसावी रविवारी 11 नोव्हेंबर रोजी जम्मू-कश्मीर नौशेरा भागात आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले. त्यांचे कुटुंबीय व संपूर्ण शिंदेवाडी गावासह तालुक्यात शोककळा पसरली. शहीद जवानाच्या पश्चात अपंग वडील, पत्नी व विवाहित बहिणी असा परिवार आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे.

यावेळी सिन्नर पंचायत समितीचे सभापती भगवान पथवे, उपसभापती जगन पाटील भाबड, गटनेते संग्राम कातकाडे, गटनेते विजय गडाख, गटविकास आधिकारी डॉ. लता गायकवाड, सहा. गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, गटशिक्षण अधिकारी शिवनाथ निर्मळ बालविकास प्रकल्प अधिकारी गोरख शेवाळे साहेब, नाशिक जिल्हा ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कैलासनाना वाघचौरे, ग्रामसेवक युनियनचे तालुकाध्यक्ष संजय गिरी, कृषि अधिकारी कैलास भदाणे, पशुधन विकास अधिकारी डॉ. मिलिंद भणगे, लेखाधिकारी विजय आघाव, ग्रामसेवक युनियन तालुका सचिव जालिंदर वाडगे, सहसचिव प्रमोद शिरोळे, संघटक संदीप देवरे, विस्तार अधिकारी संजय मोरे, शिंदेवाडीच्या सरपंच लक्ष्मीबाई हांडोरे, उपसरपंच दत्तू खाडे व ग्रामस्थ उपस्थित होते.