
मुजोर रिक्षाचालकांनी प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना ठाणे रेल्वे स्थानकात घडली आहे. रिक्षाचालकाने केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
रिक्षाचालकांच्या गुंडगिरीमुळे ठाणे रेल्वे स्थानक बदनाम झाले आहे. शहरात आणि ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रिक्षाचालकांची मुजोरी सुरूच असून किरकोळ कारणावरून रिक्षाचालक थेट प्रवाशांच्या अंगावर धावून जात असल्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. अशाच एका किरकोळ कारणावरून रिक्षाचालकाने एका प्रवाशाला बेदम मारहाण केली. मारहाण करणाऱ्या मुजोर रिक्षाचालकांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.


























































