मोबाईल पाण्यात पडल्यास काय करावे आणि काय करू नये…

23

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पावसाळा सुरू असून प्रत्येक जण आनंद देणाऱ्या या ऋतुची वाट पाहात असतो. परंतु याच दिवसात मोबाईल पाण्यात भिजल्याने डोकेदुखी मात्र वाढते. कधीकधी अचानक पाऊस येतो किंवा धबधब्यावर गेल्यावर नकळत पाण्यात पडतो किंवा लहान मुलंही त्याला पाण्याने आंघोळ घालून मोकळे होतात. मोबाईल पाण्यात पडल्याने घाबरण्याचे काम नाही, परंतु अशावेळी नक्की काय करावे आणि काय करू नये हे माहीत असायला हवे.

काय करावे?

> मोबाईल पाण्यात पडल्यास तो ताबडतोब पाण्याच्या बाहेर काढा आणि स्विच ऑफ करा.

> मोबाईलमध्ये पाणी गेल्यास सर्वात आधी सिमकार्ड आणि मेमरी कार्ड काढून घ्या. तसेच मोबाईल कव्हर, स्क्रीन कव्हर वेगळे करा.

> मोबाईलचे भाग वेगळे काढल्यानंतर प्रत्येक भाग कोरड्या कपड्याने आणि हलक्या हाताने पुसून घ्या. कोणत्याही भागावर पाण्याचा अंशही राहणार नाही, याची काळजी घ्या.

> पावसाळ्यात बाहेर पडताना मोबाईलसाठी शक्यतो वॉटरप्रूफ कव्हर वापरा.

> मोबाईल ओला झाल्यानंतर त्याचं नुकसान होऊ नये, यासाठी तांदळाच्या हवाबंद डब्यात ठेवा. एक ते दोन दिवस मोबाईल तांदळाच्या डब्यात ठेवल्यास मोबाईल कोरडा होतो.

> मोबाईल भिजला असेल तर काही काळ उन्हात ठेवता येईल. पण अतिशय कडक उन्हात ठेवल्यानं त्यातील लहान प्लास्टिक कॉम्पोनंट वितळण्याची शक्यता असते.

mobile

काय करू नये?

> ओला मोबाईल पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करू नका.

> ओला मोबाईल कधीही हेअर ड्रायरने वाळवण्याचा प्रयत्न करू नका. कारण ड्रायरमधील हवा अतिशय गरम असते, त्यामुळे फोनमधील सर्किट वितळू शकतात.

> ओला मोबाईल चार्जिंगला लावण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते.

> ओल्या मोबाईलमधील पाणी काढण्यासाठी टोकदार वस्तूचा वापर करणे टाळा. यामुळे मोबाईलचे छोटे पार्टस खराब होऊ शकतात.

mobile-rain