स्टॉक मंत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुम्हाला शेअर बाजारात रस आहे, पण स्क्रीनसमोर बसण्यासाठी वेळ नाही आणि खूप पैसेही नाहीत अशा व्यक्तींनी खालील डेरीवेटिव्ह बाजारातील डावपेच आठवडय़ासाठी घेऊन ट्रेडिंग करावे.

26/12/2023 ला म्हणजेच मंगळवारी (सोमवारी बाजार बंद आहे) आपण खालीलप्रकारे ट्रेड घेऊ शकता. आजपर्यंत मी शेअर्समध्ये ट्रेड कसे घ्यावे हे सांगितले आहे. आज मी निफ्टीमध्ये ट्रेड कसे घ्यावे हे सांगत आहे. निफ्टी कशी व कोणत्या भावावर ओपन होते त्यानुसार ट्रेड घ्या. गेल्या शुक्रवारचा निफ्टीचा बंद भाव रु. 21349 असा आहे.

दिशा- सर्वसाधारणपणे तेजी आहे. परंतु ही तेजी आणखी किती दिवस टिकेल याची खात्री नाही. मागच्या 20 डिसेंबर 2023ला निफ्टी 21600 या उच्चतम भावावर होती. त्यानंतर डेली आरएसआयने ओव्हरबॉटमध्ये असताना निगेटिव्ह डायवरझन्स दाखवला होता. मागच्या बुधवारी व शुक्रवारी जरी निफ्टीने तेजी दाखवली तरी व्हॉल्युम सदर तेजीला आधार देत नाही. त्यामुळे काही दिवस थोडी तेजी राहील असे वाटते, परंतु किती दिवस तेजी टिकेल हे सांगता येत नाही.

त्याचा अगदी जवळचा रेझिस्टन्स 21600 आहे, तसेच जवळचा सपोर्ट 21100 आहे. तेजी आहे पण अंदाज चुकला तर खूप नुकसान होऊ नये म्हणून बुल कॉल प्रेड सुचवलेला आहे. समाप्ती 28 डिसेंबर 2023, लॉट 50 गुंतवणूक- रु. 21300 जर निफ्टी सकाळी 9.30 वाजेतो तेजी दाखवत असल्यास व मंदी किंवा समांतर दाखवत नसल्यास हा ट्रेड घ्यावा. स्ट्राईक 21400 चा कॉल विकत घ्या रु. 105 स्ट्राईक 21600 चा कॉल विका रु. 33 समाप्तीपर्यंत कमाल नफा रु. 6385 कमाल
तोटा रु. 3615 मंगळवारी भावामध्ये बदल झालेला असला तरी आयडिया लागू असेल.

आपल्या आर्थिक शक्तीनुसार व्यवहार बंद करावा.
उदाहरण- संकल्पना समजावण्यासाठी घेतले आहे.
वाचकांनी लेखकाचा सल्ला समजू नये.
सविस्तर कारणमीमांसा YouTube channel ‘prime academy’ वर पाहावे.

नरेश यावलकर
(शेअर मार्पेट मार्गदर्शक)
primetechnicals.com