यमुनोत्रीला जाणारी बस 200 फूट खोल दरीत कोसळली; 22 जणांचा मृत्यू, 6 जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तरकाशीमध्ये रविवारी भीषण अपघात झाला आहे. यमुनोत्रीला जाणारी बस 200 फूट खोल दरीत कोसळली आहे. बसमध्ये 40 प्रवासी होते. हा अपघात यमुनोत्री नॅशनल महामार्गावर डामटाजवळ झाला आहे. बसमधील 40 प्रवाशांपैकी 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांचे पथक पाठवण्यात आले आहे. तसेच बचावकार्यही सुरू करण्यात आले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलीस आणि एसडीआरएफच्या पथाकाकडून बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफे पथकही घटनास्थळी रवाना झाले आहे.

ही बस मध्यप्रदेशातून यमुनोत्रीकडे जात होती. बसमध्ये मध्यप्रदेशमधील प्रवासी होते. बस डामटाजवळ आली असता 200 फूट खोल दरीत कोसळली. अपघातानंतर घटनेस्थळी गोंधळ उडाला. तातडीने पोलिसांनी अपघाताबाबत कळवण्यात आले. पोलीस आल्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले. आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

या अपघाताबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दुःख व्यक्त केले आहे. भाविकांची बस दरीत कोळण्याची घटना दुःखद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपण मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्याकडून अपघाताची माहिती घेतली असून केंद्र राज्याच्या संपर्कात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.