Photo – बदला घेण्यासाठी 80 किलोंचे शेकडो उंदीर शहरात घुसले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आयर्सपासून काही अंतरावर असणाऱ्या नॉरडेल्टा शहरामध्ये उंदरांचा हैदोस पाहायला मिळत आहे. हे साधेसुधे उंदीर नसून तब्बल 80 किलो वजनाचे आहेत. शहरांमध्ये हे उंदीर राजरोसपणे फिरत आहेत. बागा, मैदानं, रस्ते सर्वत्र हे उंदीरच दिसत आहेत. या घुसखोरांमुळे शहरातील रहिवासी हैराण झाले आहेत.

capybaras-3

जगातील सर्वात मोठ्या उंदराना कॅपीबरास (Capybaras) असे म्हटले जाते. याचे शास्त्रीय नाव हायड्रोकोरस हायड्रोचेरिस असे आहे. तर काही लोक यांना कारपिन्चोस असेही म्हणतात. या उंदरांची लांबी 4 फूट आणि वजन जवळपास 80 किलोंच्या आसपास आहे. नॉरडेल्टामध्ये हे उंदीर सर्वत्र पाहायला मिळत आहेत.

capybaras-1

पर्यावरणवाद्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उंदरांनी शहरात घुसखोरी केली नसून आपले घर पुन्हा मिळवण्यासाठी ते आले आहेत. 1990 च्या दशकात नॉरडेल्टाचा हा भाग जैवविविधतेने नटलेला होता. येथे शेकडो प्रकारचे जीव-जंतू रहात होते. मात्र माणसाने आपल्या हव्यासापोटी येथे शहर वसवले आणि कोट्यवधींच्या योजना आणल्या. यामुळे या उंदरांची घरे नष्ट झाली.

capybaras-2

सरकारने रिअल इस्टेट एजंटसोबत मिळून पर्यावरणाचा खेळ मांडला. त्यावेळीही शेकडो लोकांनी आवाज उठवला होता, मात्र सरकारने कोणाचेही ऐकले नाही. लोकांना घरांचे आमिष दाखवून बिल्डर्स लोकांनी येथील प्राण्यांना पळवून लावले. हेच प्राणी आता आपले घर घेण्यासाठी पुन्हा आले आहेत.

capybaras