पत्नी दिवसभर सेल्फी काढत असते, जेवणही देत नाही, घटस्फोट द्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। भोपाळ

मोबाईल फोन ही काळाची गरज असली तरी त्याच्या अतिवापराचा संबंध थेट नातेसंबंधावर होऊ लागला आहे. असेच एक प्रकरण भोपाळ येथील कौटुंबीक न्यायालयात आले असून पत्नी सतत व्हॉट्सअॅपवरच बिझी असते व आपल्याला जेवणही देत नाही. त्यामुळे आपल्याला घटस्फोट द्यावा अशी याचिका एका पत्नी पिडीताने न्यायालयाला केली आहे.

तर न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकूण पतीचा घटस्फोटाचा अर्ज फेटाळला असून पतीने पत्नीला नवीन स्मार्ट फोन घेऊन द्यावा, महिन्यातून एकदा सिनेमाला न्यावे, नवीन कपडे घेऊन द्यावे,तिला खर्चाला पैसे द्यावे व हिशोबही विचारू नये याबरोबर अनेक सूचना दिल्या आहेत.

संबंधित तरुणाचा विवाह वर्षभरापूर्वी गावातील तरुणीबरोबर झाला होता. पण पत्नीला पतीबरोबर बोलण्यापेक्षा मोबाईलवर चॅटींग करणेच जास्त आवडायचे. चॅटींगच्या नादात ती जेवणही बनवत नसे यामुळे कामावरून आल्यावर पतीला उपाशीच झोपावे लागे. यावरून त्यांच्यात रोज वाद व्हायचा. अखेर हा वाद विकोपाला गेल्याने पतीने न्यायालयात धाव घेतली व घटस्फोटाची मागणी केली. पण पत्नीने पतीवरच आरोप करत तो आपल्याला माहेरच्यांबरोबर बोलायला देत नाही, स्वत:साठी त्याने स्मार्टफोन घेतला आहे. पण मला साधा फोन दिला आहे. असे सांगितले. तसेच तो आपल्याला कुठेही बाहेर नेत नाही. असेही तिने न्यायालयाला सांगितले. यावर न्यायालयाने पतीचेच कान टोचत त्याचा घटस्फोटाचा अर्ज फेटाळून लावला. तसेच पत्नीच्या इच्छा पूर्ण करण्याचे निदर्श न्यायालयाने त्याला दिले.