
आयकर विभागाच्या 15 अधिकाऱ्यांच्या पथकाने मंगळवारी दिल्ली आणि मुंबईतील बीबीसीच्या कार्यालयात धाडी टाकल्या. सूत्रांनी सांगितले की बीबीसी कार्यालयातील धाडी आंतरराष्ट्रीय कर आकारणी आणि हस्तांतरण किंमतीतील अनियमिततेच्या आरोपांशी संबंधित आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची तपास मोहीम गेल्या साडेतीन तासांपासून सुरू आहे.
दरम्यान, 02002 च्या गुजरात दंगली आणि हिंदुस्थान या विषयावर BBC ने दोन भागांची डॉक्युमेंट्री प्रसारित केली होती. यावरून वादळ उठलं होतं. भाजपने या डॉक्युमेंटरीचा विरोध केला. केंद्रानं यावर बंदी घातली होती. तर भाजप समर्थकांनी BBC वर बंदी घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र न्यायालयाने अशी सरसकट बंदी घालण्याची याचिका फेटाळली होती. त्यानंतर काही दिवसातच ही धाड पडली आहे. आयटी अधिकार्यांच्या तपासाच्या वृत्ताच्या दरम्यान, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केंद्रावर टीका केली आणि त्याला ‘अघोषित आणीबाणी’ म्हटले.
काँग्रेसचे गौरव गोगोई यांनीही ट्विटरवर लिहिले, ‘जी-20 राष्ट्रांचे अध्यक्षपद देशाकडे असताना, पंतप्रधान मोदी निर्लज्जपणे देशातील एकाधिकारशाही आणि हुकूमशाहीकडे चाललेली वाटचाल दाखवत आहेत. बीबीसीवर छापे, अदानींना क्लीन चिट, करात कपात…, लोकांची घरे बुडाली आहेत, विषमता आणि बेरोजगारी वाढत आहे’.
At the time India holds the Presidency of the G-20 nations, PM Modi continues to brazenly show India’s slide into authoritarianism and dictatorship. Raids on BBC, clean chit to Adani, tax cuts for rich, people’s homes being bull dozed, inequality and unemployment on the rise.
— Gaurav Gogoi (@GauravGogoiAsm) February 14, 2023
समाजवादी पक्षाचे (एसपी) अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की, बीबीसी कार्यालयांवर छापे टाकण्याचे वृत्त ‘वैचारिक आणीबाणी’सारखेच आहे.
BBC पर छापे की ख़बर ‘वैचारिक आपातकाल’ की घोषणा है। @BBCIndia
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) February 14, 2023
तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) नेत्या महुआ मोइत्रा यांनीही ट्विटरवर लिहिलं, ‘बीबीसीच्या दिल्ली कार्यालयावर आयकर छाप्याचे वृत्त. व्वा, खरंच? किती अनपेक्षित आहे’.
Reports of Income Tax raid at BBC’s Delhi office
Wow, really? How unexpected.
Meanwhile farsaan seva for Adani when he drops in for a chat with Chairman @SEBI_India office.
— Mahua Moitra (@MahuaMoitra) February 14, 2023
BBC जगातील ‘सर्वात भ्रष्ट’ महामंडळ आहे आणि त्याचा प्रचार आणि काँग्रेसचा अजेंडा एकच आहे, असा पलटवार भाजप नेते गौरव भाटिया यांनी केला आहे. आयकर विभाग स्वतःहून कारवाई करत असून भाजपचा याच्याशी संबंध नसल्याचंही ते म्हणाले.

























































