पाकिस्तानात दाऊद मेला तर वाट लागेल, पाकिस्तानी महिला पत्रकाराने केली पोलखोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

हिंदुस्थानचा कुख्यात गॅंगस्टर दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानात विषप्रयोग झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. त्यामुळे दाऊद नक्की जिवंत आहे की नाही असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या एका महिला पत्रकाराने दाऊद इब्राहिमबाबत खळबळजनक दावा केला आहे.

आरजू कामिज असे या पाकिस्तानी पत्रकार महिलेचे नाव आहे. आरजूने असे म्हंटले आहे की, दाऊद इब्राहिमवर अज्ञातांकडून विषप्रयोग करण्यात आला असून त्याला कराचीतील रूग्णालयात दाखल करण्यात आले. दाऊदला रुग्णालयात दाखल करणे हा केवळ पाकिस्तानने आपली प्रतिमा सुधरवण्यासाठी केलेला प्रयत्न असू शकतो. मात्र पाकिस्तानात याबाबत कुणी भाष्य केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे काझमीने म्हटले आहे.

पत्रकार आरजू काझमी यांचा दावा आहे की, दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये आहे हे पाकिस्तान सरकार अजूनही मान्य करत नाही. कारण तो अजूनही हिंदुस्तानी नागरिक म्हणून ओळखला जातो. पाकिस्तानात असा हिंदुस्तानी दहशतवादी नसावा असे तेथील लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे खुद्द पाकिस्तानलाच दाऊद इब्राहिमसारख्या लोकांना त्यांच्या मार्गातून हटवायचे असेल, अशी शक्यता असल्याचे तिने म्हंटले आहे.

दाऊद इब्राहिम इथे मारला गेला किंवा तो कोणत्याही आजाराने मेला तर पाकिस्तान ते कधीच मान्य करणार नाही. कारण यामुळे पाकिस्तानला अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो असे आरजूचे म्हणणे आहे. त्यामुळे आरजूच्या या वक्तव्यानंतर दाऊद इब्राहिमला पाकिस्तानमध्ये विषबाधा झाल्याची बातमी अजूनही अफवाच म्हणता येईल.