सुवर्णमहोत्सवी इफ्फीचा शुक्रवारी समारोप

295

20 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या सुवर्णमहोत्सवी इफ्फीचा समारोप शुक्रवारी दुपारी 3 वाजता बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये होणार आहे. समारोप सोहळ्यात सुवर्णमयूराचा मानकरी कोण ठरणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. प्रख्यात संगीतकार इलिया राजा यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये समारोप सोहळा रंगणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या