आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थी फैजान अहमद ऑक्टोबर 2022मध्ये त्याच्या वसतिगृहात मृतावस्थेत सापडला होता.फैजानच्या मृत्यूला आयआयटी खडगपूर येथे आत्महत्या सांगितली होती. मात्र तरुणाच्या आई-वडिलांनी त्यांनी मुलाच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला होता. त्यानंतर त्यांनी कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने दुसऱ्यांदा शवविच्छेदनाचे आदेश दिले होते. ज्यामध्ये फैजानने आत्महत्या नसल्याचे समोर आले आहे.
उच्च न्यायालयाने विद्यार्थ्याचा मृत्यूच्या तपासासाठी एक विशेष तपास पथक स्थापन केले होते. सोबत न्य़ायालयाने एसआयटीला याप्रकरणी संशयित व्यक्तीचे नार्को चाचणी करण्याची परवानगी दिली आहे. तज्ज्ञांनी आधी शवविच्छेदन अहवालावर प्रश्नचिन्ह उभारले. त्यानंतर फैजान याचा मृतदेह दफनभूमीतून काढून कोलकाताला घेऊन आले आणि त्यावर पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले.
कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर फैजानच्या मृतदेहाची दुसरी पोस्टमार्टम तपासणी केली होती. अहमदच्या मानेवर वरच्या डाव्या बाजूला बंदुकीच्या गोळीच्या जखमा आणि उजव्या बाजूला चाकूने वार केल्याच्या खुणा दिसल्या, असे अहवालात म्हटले आहे. तथापि, या जखमांचे प्राथमिक तपासादरम्यान पोलिसांनी दस्तऐवजीकरण केलेले नाही किंवा ऑक्टोबर 2022 मध्ये मिदनापूर वैद्यकीय महाविद्यालयात घेतलेल्या पहिल्या शवविच्छेदनादरम्यान त्यांचे चित्रीकरण करण्यात आले नाही, असे अहवालात नमूद केले आहे.
वास्तविक, फैजानच्या आई-वडिलांनी IIT खडगपूरवर फैजानचा मृत्यू लपवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर हायकोर्टाने आयआयटीला फटकारले आणि शवविच्छेदनाचे आदेश कबरीतून बाहेर काढण्याचे आदेश दिले. हे आदेश देताना न्यायालयाने या प्रकरणातील सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे आवश्यक असल्याचे म्हटले होते. तर विद्यार्थ्याचे आई-वडिलांनी न्यायालयात सांगितले होते ती, सिनीअर्सने त्याच्यासोबत रॅगिंग केली होती. ज्याची तक्रार त्याने व्यवस्थापकांना सांगितले होते. मात्र आयआयटी व्यवस्थापक त्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले होते.