
देवगड एस टी स्टँड समोरील देवगड नगरपंचायतच्या वतीने उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटचे उद्घाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर, सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना नेते अतुल रावराणे , नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी, तेजस मामघाडी, रोहन खेडेकर, शिवसेना तालुका प्रमुख मिलिंद साटम, जयेश नर, काका जेठे, माजी सभापती रविंद्र जोगल, गणेश वाळके, निनाद देशपांडे, हर्षा ठाकुर आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
देवगड एस टी स्टँड समोर सेल्फी पाँईंट उभारण्यात आला आहे. या पॉईंटला किल्याचे स्वरुप देवून आंब्याची प्रतिकृती बनविण्यात आली आहे. या सेल्फी पाँईंटचे उदघाटन झाल्यानंतर देवगड मधील अनेक उत्साही तरुण तरुणींनी सेल्फी फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती. पर्यटन एके पर्यटनाच्या माध्यमातून गोवा राज्याचा विकास झाला असून या गोव्यापेक्षाही देवगडमध्ये सुंदर पर्यटन स्थळे आहेत. मात्र पायाभुत सुविधांअभावी पर्यटकांना थोडीफार खिळ बसत आहे. मात्र गेली अलिकडे देवगड पवनचक्कीवर गार्डन, झिपलाईन, वॅक्स म्युझियम व पर्यटनाच्या सोयी सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे देवगडमध्ये देखील पर्यटकांचा ओघ हळूहळू वाढु लागला आहे. यामुळे आता सेल्फी पाँईंटमुळेही पर्यटनाला बहर येणार आहे.



























































