
सामना ऑनलाईन । तिरुअनंतपुरम
‘हिंदुस्थान-अ’ आणि ‘इंग्लंड लायन्स’ संघात येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय मैदानावर उसूर असलेल्या चौथ्या सामन्यात दरम्यान मधमशांनी हल्ला चढवला. यामुळे सामना 15 मिनिटांसाठी रोखण्यात आला होता. मधमाशांच्या हल्ल्यात 5 प्रेक्षक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
इंग्लंडची फलंदाजी सुरू असताना अचानक मधमाशांनी मैदानावर हल्ला चढवला. यामुळे खेळ थांबवण्यात आला. हा हल्ला झाला तेव्हा हिंदुस्थान अ संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड मैदानावर उपस्थित होता. परंतु मधमाशांच्या हल्ल्यामुळे त्याला काढता पाय घ्यावा लागला. हा हल्ला 2008 मध्ये दिल्लीतल फिरोज शहा कोटला मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका सामना सुरू असताना झाला होता तसाच होता.

























































