न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी संघाची घोषणा; रहाणे कर्णधार, रोहित शर्मासह अनेकांना विश्राम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्यूझीलंड विरुद्ध होऊ घातलेल्या कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी शुक्रवारी टीमची घोषणा करण्यात आली. यामध्ये अजिंक्य रहाणेकडे टीमचे नेतृत्त्व देण्यात आले आहे. तर दुसऱ्या कसोटीत विराट कोहली पुनरागमन करणार असल्याचे बीसीसीआयच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

रोहित शर्मा टी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे कसोटीत त्याला आराम देण्याची शक्यता आधी वर्तवण्यात आली होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. गुरुवारपासून निवड समितीची बैठक सुरू होती. त्यानंतर टीमची घोषणा करण्यात आली. ऋषभ पंतला देखील आराम देण्यात आला आहे.

असा असेल संघ – अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजार (उपकर्णधार), केएल राहुल, एम अग्रवाल, एस गील, एस अय्यर, डब्लू सहा (विकेटकिपर), केएस भारत (विकेटकिपर), आर जाडेजा, आर अश्वीन, अश्मित पटेल, जे यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, एमडी सिराज, पी क्रिष्णा

टी-20 वर्ल्ड कपच्या नंतर लगेच न्यूझीलंडची टीम हिंदुस्थानात खेळेल. इथे तीन टी-20 आणि दोन कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहेत. दोन कसोटी पैकी एक कानपूर आणि दुसरी कसोटी मुंबईत खेळवली जाणार आहे.

टीम इंडिया – न्यूझीलंड मालिकेचे शेड्यूल

17 नोव्हेंबर – पहिली टी20 (जयपूर)
19 नोव्हेंबर – पहिली टी20 (रांची)
21 नोव्हेंबर – पहिली टी20 (कोलकाता)
पहिली कसोटी – 25 – 29 नोव्हेंबर (कानपूर)
दुसरी कसोटी – 3 – 7 डिसेंबर (मुंबई)