
वन डे वर्ल्डकपमधील लढतीत हिंदुस्थानने पाकिस्तानचा 7 विकेट्सने दणदणीत पराभव केला. पाकिस्तानने विजयासाठी दिलेले 191 धावांचे आव्हान हिंदुस्थानने रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या बळावर पार केले. यानंतर एक खास दृश्य मैदानात पाहायला मिळाले. स्टार फलंदाज विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांनी एकमेकांशी बराच वेळ चर्चा केली. यानंतर विराटने सही केलेली जर्सी बाबरला भेट दिली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
विराट कोहली याचे मोठे मन पाहून चाहते खुश झाले आहेत. मात्र पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीन अक्रम याला ही मैत्री खास आवडलेली नाही. त्यामुळे त्याने बाबर आझमला झापले आहे. दारुण पराभवानंतर त्याच मैदानावर बाबरने असे कृत्य करायला नको होते असे अक्रम म्हणाले.
पाकिस्तानी टीव्ही शोमध्ये बोलताना अक्रम म्हणाले की, हे दृश्य पाहिल्यावर माझ्या मनात हेच आले की आज हे असे वागण्याचा दिवस नव्हता. मी असतो तर सामना संपल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये हे असे केले असते.
View this post on Instagram


























































