
सामना ऑनलाईन । नागपूर
नागपूर येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त खेळी करत ऑस्ट्रेलियावर 8 धावांनी मात केली. या विजयासह हिंदुस्थानने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. विराट कोहलीचे शतकी खेळी व जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, विजय शंकर या गोलदांजांनी योग्य वेळी विकेट घेतल्याने हिंदुस्थानने हा सामना जिंकला. शतकी खेळी करणाऱ्या विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे.
#INDvAUS: India defeat Australia by 8 runs to win the second ODI, lead the series 2-0 in 5 match series. pic.twitter.com/8YevyiqXO3
— ANI (@ANI) March 5, 2019
प्रथम फलंदाजी करणाऱ्या हिंदुस्थानी संघाने ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी २५१ धावांचे लक्ष्य़ ठेवले होते. कर्णधार विराट कोहलीने केलेल्या 116 धावांमुळे टीम इंडिया 250 पर्यंत पोहचू शकली. तर विराट व विजय शंकर वगळता इतर सर्व फलंदाजांनी निराशा केली. ऑस्ट्रेलियाने धडाकेबाज फलंदाजी करत सुरुवातीला सामन्यावर पकड घेतली होती. अॅरोन फिंच व उस्मान ख्वाजा यांनी पहिल्या विकेटसाठी 83 धावांची भागिदारी केली. नंतर दोघेही लागोपाठ बाद झाले. त्यानंतर पीटर हेड्सकोम्ब व मार्कस स्टॉयनिस यांनी ऑस्ट्रेलियाला विजयाच्या जवळ नेले होते. मात्र बुमराहचा व कुलदीप यादवच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचा संघ ढेपाळला व हिंदुस्थानने दुसरा सामना 8 धावांनी जिंकला
.



























































