ईशान्येकडील राज्यात सैन्याची मोठी कामगिरी, नागा फुटीरवाद्यांची अनेक कॅम्प नष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मणिपूर आणि नागालँडमध्ये हिंदुस्थानी सैन्याने अनेक फुटीरवादी संघटनांची कॅम्प नष्ट केली आहे. सैन्याला एनएससीएन या संघटनेची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर सैन्याने इथे आपली निगरानी वाढवली आणि वेळीच ते नष्ट करून टाकले. ६ जुलै रोजी सैन्याने ही कारवाई केली आहे.

हिंदुस्थानशी केलेल्या करारानुसार या संघटनेला त्यांनी तयार केलेल्या कॅम्पमध्येच राहण्याची परवानगी आहे. इतर ठिकाणी नवी कॅम्प तयार करणे आणि राहणे हे बेकायदेशीर मानले जाते. केकरू गावात त्यांनी आपले कॅम्प उभारले होते ते हिंदुस्थानी सरकारने नष्ट केले.

सैन्याला केकरू गावात हे फुटीरवादी राहत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. नुगाबू गावात हे फुटीरवादी आपल्या कारवाया करत होत्या तक्रार सैन्याला मिळाली होती. 5 जुलै रोजी सैन्याने हल्ला करण्याचा नियोजन केले. सैन्याच्या कारवाईची कुणकूण आधीच नागा फुटीरवाद्यांना मिळाली तेव्हा त्यांनी पळ काढला. सैन्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हत्यारे, दारू –गोळा, तंबू, युनिफॉर्म आणि युद्धसामग्री मिळाली.