
कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी रात्री 8 वाजता ही घोषणा केली. यामुळे देशभरातील रेल्वे, विमान आणि बससेवा बंद झाली आहे. मोदींच्या घोषणेनंतर रेल्वे प्रशासनाने देखील मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर सेवा 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासी वाहतुक बंद असली तरी मालगाड्या सुरू राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी रात्री 8 वाजता देशाला संबोधित केले. पुढील 21 दिवस संपूर्ण देशात लॉकडाऊन असणार आहे, असे मोदींनी स्पष्ट केले. अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार असल्याचे केंद्र सरकारने सांगितले. मोदींच्या घोषणेनंतर रेल्वेने देखील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर सेवा 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी रेल्वेने 31 मार्च पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली होती.
Ministry of Railways has decided to extend the cancellation of passenger train services on Indian Railways, passenger trains, suburban trains and trains of Metro Railway, Kolkata till 2400 hours of 14th April 2020. Freight train operations to continue. #CoronavirusLockdown pic.twitter.com/i1ovY78RdT
— ANI (@ANI) March 25, 2020
दरम्यान, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातुन धावणाऱ्या सर्व एक्स्प्रेस आणि पँसेजर रेल्वे 14 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे तिकीट आरक्षण करु नये असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कळवले.
रेल्वेने 31 मार्चपर्यंत रेल्वे बंद असल्याचे जाहिर केले होते. मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे बोर्डाने 14 एप्रिल पर्यंत सर्व एक्स्प्रेस आणि पॅसेंजर रेल्वे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने रेल्वे बंद राहणार आहेत. 14 एप्रिल पर्यंत तिकिट खिडकी आणि आरक्षण खिडकी बंद राहणार आहेत.



























































