पाकड्यांच्या हनी ट्रॅपमध्ये फसला अभियंता, ब्राह्मोसची खबर लिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नागपूर

‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्राची माहिती पाकिस्तान आणि अमेरिकेला लिक करणाऱ्या वरिष्ठ अभियंता निशांत अगरवाल याला आज उत्तर प्रदेश एटीएस आणि मिलिट्री इंटेलिजन्सच्या पथकाने ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. निशांत हा पाकिस्तानने फेसबुकवर लावलेल्या ‘हनी ट्रॅप’मध्ये सापडल्याचे पुरावेही तपास यंत्रणांना सापडले आहेत.

निशांत हा मूळचा उत्तराखंड रुकरीचा रहिवासी आहे. तो चार वर्षांपासून ब्राह्मोस एरोस्पेस प्रा. लि.मध्ये कामाला आहे. ही ब्राह्मोस कंपनी डीआरडीओ आणि मिलिटरी इंडस्ट्रियल कॉन्सरटियम एनपीओ मशिनोस्त्रायेनिया यांची संयुक्त कंपनी आहे. निशांतला गेल्या वर्षी युवा वैज्ञानिकाचा पुरस्कारही मिळाला आहे.

पाकिस्तानी फेसबुक अकाऊंटशी चॅटिंग
पाकिस्तानमधून महिलांच्या बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे हिंदुस्थानमधील राष्ट्रीय सुरक्षाविषयक संवेदनशील संस्थांमध्ये काम करणाऱ्या लोकांना फसवण्याची कार्यपद्धती समोर आल्यानंतर हिंदुस्थानात बीएसएफच्या जवानांवर यापूर्वी अटकेची कारवाई झालेली आहे. त्यावेळी पाकिस्तानमधून महिलांच्या नावे चालवली जाणारी दोन फेसबुक अकाऊंट समोर आली. अशा अकाऊंटवर उत्तर प्रदेशच्या एटीएसची करडी नजर होती. या पाक फेसबुक अकाऊंटशी निशांत अगरवाल चॅटिंग करीत असल्याचे समोर आले. निशांत हा हनीट्रॅपमध्ये अडकल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली व आज त्याला अटक करण्यात आली.

निशांत हा अमेरिकन गुप्तचर संघटना सीआयएचा दिल्लीतील एजंट आणि पाकिस्तानी हँडलर यांच्या संपर्कात होता. ब्राह्मोसची तांत्रिक माहिती पाठविण्यासाठी त्याने इनक्रिप्टेड, कोडवर्ड आणि कॉम्प्युटर गेमवरील चॅटिंग झोनचा वापर केल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

summary- information of brahmos got leak by indian engineer