
अमेरिकेतील मिसूरी राज्यातून भीषण विमान दुर्घटना घडली आहे. स्कायडायव्हिंगसाठी निघालेले विमान कोसळून वैमानिकासह 12 जणांचा मृत्यू झाला. कॅन्सस सिटीच्या दक्षिणेला सुमारे 60 मैल अंतरावर असलेल्या बटलर येथील विमानतळाजवळ हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच बचाव आणि मदत पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, पॅसिफिक एरोस्पेसच्या P650 विमानाने स्थानिक वेळेनुसार रविवारी सकाळी अंदाजे 11.34 वाजता मिसूरीमधील बटलर मेमोरियल विमानतळावरून टेकऑफ केले. या विमानात वैमानिक आणि 11 स्कायडायव्हर्स होते. टेकऑफनंतर हे विमान लगेचच कोसळले. कोसळल्यानंतर विमानाला आग लागली. या अपघातात विमानातील सर्व 12 जणांचा मृत्यू झाला.

























































