
जम्मू-कश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात तीन व्यक्तींकडून स्फोटक पदार्थ आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे पोस्टर्स जप्त करण्यात आले. चौकशी नंतर त्यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.
दक्षिण कश्मीरमधील शोपियान जिल्ह्याच्या पुद्सू भागात गुरुवारी रात्री पोलिसांनी या तिघांकडून दोन ग्रेनेड, २.५ किलो पीईके, चार मोबाईल फोन आणि दहशतवादी संघटनेशी संबंधित पोस्टर्स जप्त केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलिसांनी या व्यक्तींची ओळख ऐजाज अहमद खांडे, अरबाज अहमद मीर आणि नासिर अहमद डार अशी सांगण्यात आली आहे. हे तिघेही शोपियान मधील बेगामा गावचे रहिवासी आहेत.
हे तिघेही गेल्या ३१ मे पासून आपल्या घरातून बेपत्ता होते, असेही पुढे सांगण्यात आले.




























































