अखेरच्या क्षणी घानाची पनामावर मात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ghana-beats-panama-1-0-fifa-world-cup-caleb-ekuban-scores-last-minute-winner

फिफा वर्ल्ड कपमध्ये घानाने विजयी सुरुवात करताना पनामाचा 1-0 गोलफरकाने पराभव केला. सामन्यातील एकमेव आणि निर्णायक गोल कॅलेब यिरेन्कीने दुखापत वेळेत नोंदवत घानाला महत्त्वाचे तीन गुण मिळवून दिले.

पहिल्या सत्रात दोन्ही संघांना फारशा गोलसंधी निर्माण करता आल्या नाहीत. पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत संपला. दुसऱ्या सत्राच्या अतिरिक्त वेळेतील पाचव्या मिनिटाला घानाच्या कॅलेब यिरेन्कीने चेंडू जाळ्यात धाडत घानाच्या चाहत्यांना जल्लोषाची संधी दिली. या गोलनंतर लगेचच अंतिम शिट्टी वाजली आणि घानाने 1-0 असा थरारक विजय आपल्या नावावर केला.