
फिफा विश्वचषक स्पर्धेत कोलंबियाने विजयी सलामी देताना उझबेकिस्तानचा 3-1 असा पराभव केला. या विजयामुळे कोलंबिया ‘के’ गटात अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
कोलंबियाने 40 व्या मिनिटाला शानदार सांघिक चालीचा शेवट करत डॅनिएल मुनोझने गोल नोंदवला.उझबेकिस्तानने 60 व्या मिनिटाला गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. कोलंबियाचा स्टार लुईस डियाझने 65 व्या मिनिटाला त्याचा तुलनेने साधा फटका उझबेक गोलरक्षकाला रोखता आला नाही आणि कोलंबियाने पुन्हा 2-1 अशी आघाडी घेतली.
सामन्याच्या अखेरच्या क्षणी कोलंबियाने जुआन हर्नांदेजच्या अप्रतिम चालीवर जॅमिंटन कॅम्पाझने गोल करत 3-1 असा विजय निश्चित केला. कोलंबियाने तीन गुणांची कमाई केली.




























































