
पूर्व हंगेरीमधील एका महामार्गावर रविवारी पहाटे पर्यटकांची बस उलटली. अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातप्रकरणी बस चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पोलंडच्या पर्यटकांची बसमध्ये 57 प्रवासी आणि दोन चालक होते. ही बस रविवारी पहाटे महामार्गावरून न्यिरेगीहाझा शहराकडे चालली होती. ही बस रस्त्यावरून घसरून खड्ड्यात उलटली. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
























































